Salman Khan : भाईला पुन्हा धमकी! तर सलमानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट करू…

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास आठवडा होत आला आहे. शनिवारी रात्री त्यांची वांद्रे येथे गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रच नव्हे अख्खा देश हादरलाय. सिद्दीकी यांचे बॉलिवूडमध्येही अनेकाँशी सख्य होते. अभिनेता सलमान खान तर त्यांचा खूप जवळचा मित्र. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली.

याच लॉरेनस्चे सलमानशी असलेलेल वैरही जगजाहीर आहे. त्यातच सलमानचे खास मित्र असलेल्या बाबा सिद्दीकी यांचीही निर्घृण हत्या झाल्याने तो हादरला असून सलमानच्या सुरक्षेत कडकोट वाढ करण्यात आली आहे.याचदरम्यान आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावे पन्हा धमकी देण्यात आली आहे. सलमानसोबत असलेले भांडण संपवण्यासाठी लॉरेन्स गँगने 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळाला आहे.

हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचाही दावा करण्यात आला आहे.ट्रॅफिक पोलिसांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘ लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलानकडून 5 कोटी मागितले आहे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल’, असा इशाराही या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला.  मात्र या मेसेजमुळे एकच खळबळ माजली असून सुरक्षा एजन्सींमध्ये चिंता वाढली आहे.  सलमानचे चाहतेही या बातमीमुळे चिंतेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.