मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने विनयभंग केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि यादव याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत.