हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील १७ गावांतील विविध विकासकामांसाठी तब्बल ६.९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आम्ही केलेल्या पाठपुराव्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना देत शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास या निधीच्या माध्यमातून महायुतीची विकासगंगा गावागावांत पोहोचत असल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी दिली. समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अनेक लोकाभिमुख योजना राबवत आहे.
त्यानुषंगाने हातकणंगले तालुक्यातील १७ गावांत विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीतून अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून गावांतील भौतिक सोयी सुविधा अधिक बळकट करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही मुरलीधर जाधव यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत हातकणंगले तालुक्यातील मंजूर झालेला निधी विशेषतः दलित, बौद्ध व नवबौद्ध नागरिकांच्या सेवेत वापरला जाणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे मतही मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात आहेत.