राजूबाबा आवळे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात…….

काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतून आमदार राजूबाबा आवळे आणि करवीर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली.

माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव असलेले राजूबाबा हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी गेल्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

आता पुन्हा डॉ. मिणचेकर रिंगणात उतरण्याची शक्यता असून जनसुराज्यचे अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित आहे.