एकीकडे भाजप, शिवसेना (UBT) आणि मनसेने आपआपल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केलेल्या असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अद्यापही चर्चाच सुरू होती.मात्र आज (23 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास याबाबतची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. जागा वाटप हा महाविकास आघाडीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरला होता. पण अखेर काही मिनिटांपूर्वीच हे जागा वाटप पूर्ण झाल्याची खात्रीलायक माहिती हाती लागली आहे.
भाजपने रविवारी आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाने काल (22 ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली असताना महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नव्हता. अखेर बैठकांच्या अनेक फैरी पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं आहेमिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढविणार असून शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्या खालोखाल जागा लढवणार आहेत.
काँग्रेस – 104 जागा लढवणार
शिवसेना (UBT) – 96 जागा लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार – 88 जागा लढवणार
दरम्यान, याच जागांमधून मित्र पक्षांना देखील जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या तीनही पक्षांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.