महायुतीला (Mahayuti) मत म्हणजेच अजित दादांना (Ajit pawar) खरी श्रद्धांजली असणार आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलं आहे . राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
देशातील दिग्गज नेत्यांनीही अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनीहेभाष्यकेलंआहे.
यावेळीबोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ‘त्या विरोधकांना सांगा, शाळेच्या खोल्या पत्र, रस्ते सगळं सगळं या ग्रामविकासकडे आहे रे.. मी परफेक्ट झालो आणि जया भाऊपाशी जाऊन बसलो. नगरपालिकेला शिंदे साहेब लागतात की लगेच धनुष्यबाणावर पण जिल्हा परिषदेला जया भाऊ लागतात. मग इकडं कमळ, धनुष्यबाण सगळंच हाय.. आपण आपलं डोकं चालवलं आणि जया भाऊला म्हणलं घ्या आम्हाला पोटात…’ अशा शब्दात शहाजी बापूंनी सांगोल्याच्या प्रचार सभेत जोरदार टोलेबाजी केली. शहाजी बापू आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी सांगोल्यात प्रचार सभांचा धडाका लावला होता. यावेळी जयकुमार गोरे यांच्या समोरच आपण भाऊंपाशी का गेलो याचा खुलासा मिश्किल भाषेत बापूंनी सांगितला.
विरोधकांवर टोलीबाजी करताना ही स्वतःची पोरे निवडून आणण्यासाठी सगळ्या तालुक्याच्या पोरांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत. असा टोला लगावत एकटा पडल्याने काय होते. माझा पुतण्या गेल्या वेळी 59 मताने पडला. पडला म्हणून निवडणूक लढवायची नाही का असे सांगताना माझ्याकडे बघा, मी इतक्या वेळा पडलो की माझं पाठ सुद्धा मोडले, पण मी कधी पडायला घाबरतो का? असे सांगत विरोधकांची खिल्ली उडवली. चोपडी गटातून जिल्हा परिषदेत निवडणूक लढविणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार हे बाहेरचे उमेदवार आहेत. अशी टीका शेकाप करीत असल्याचे सांगत स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख मोहोळ तालुक्यातून येऊन 65 वर्ष येथे राजकारण केले. त्यांना कधी आम्ही बाहेरचे म्हणलो का? असा टोला शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांना लगावताना केदार तर सांगोला तालुक्यातीलच असल्याचे बापूंनी सांगितले.
