Maharashtra Weather Update: सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रावर संकट! मोठा अलर्ट…..

पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता वाढली आहे. 27 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू, पदुचेरी आणि दक्षिण भारतात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.समुद्र किनाऱ्याजवळच्या भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. अचानक तापमानात घट झाली आहे. तर डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट देणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात गारवा वाढायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या सुमारास गारठा जास्त वाढला असून 8-10 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी 12 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडेल. त्यामुळे तुम्ही स्वेटर, गरम कपडे तयार ठेवा असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. येत्या 48 तासात सामान्यपासून दीड ते 3 अंश सेल्सियस तापमान कमी होण्याची शक्यता आहे.

तर दिवसा तापमान वाढण्याची शक्यता आहे.सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे केरळसह दक्षिण भारतात गारा, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाचा पुढचे 7 दिवस कोणताही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. मात्र तापमानात 3 डिग्रीपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.