सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. द्राक्ष, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या १७१ टक्के पाऊस झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचं पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती कृषीविभागाकडून देण्यात आली आहे.सांगली जिल्ह्यातील उत्पादकांना अवेळी पावसाच्या स्थितीचा मोठा फटका बसत आहे. छाटणी घेतलेल्या बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस झाला की फवारणी घ्यावी लागते यामुळे औषध फवारणीने शेतकरी घाईला आला आहे.
या सगळ्यात उत्पादनात घट होण्याचीही भिती आहे. बागांमध्ये पाणी साचून राहात आहेत. त्यामुळे मुळांना फटका बसत आहे, अशा अवस्थेत घड चांगले वाढू शकत नाहीत. शिवाय, बागातून पाणी बाहेरच पडत नसल्याने अडचण झाली आहे, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.