मार्चमध्ये 10 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी……

आज फेब्रुवारी महिना संपेल आणि मार्च (March 2024) महिना सुरू होईल. मार्चमध्ये अनेक सण असल्याने शाळांना सुट्ट्या असतील. मार्चमध्ये शाळांना कोणत्या दिवशी सुट्या आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.मार्च 2023 हा महिना शाळकरी मुलांसाठी खूप चांगला असणार आहे कारण या महिन्यात सण आल्याने शाळांना सुट्ट्या असणार आहेत. तसेच हिवाळा संपल्याने लवकरच शाळांच्या वेळा बदलण्याही बदलण्यात येणार आहेत.

मार्च महिन्यात होळी हा सण साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण असून तो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळी सण 24 की 25 मार्चला साजरा होणार याच्या तारखेबाबत संभ्रम आहे. यावेळी 24 मार्चला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. चला मार्चमधील विद्यार्थ्यांच्या शाळांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी पाहूयात.

मार्च 2024 मधील शाळांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी

3 मार्च 2024: रविवार 8 मार्च 2024: महाशिवरात्री 9 मार्च 2024: दुसरा शनिवार 10 मार्च 2024: रविवार 17 मार्च 2024: रविवार 23 मार्च 2024: चौथा शनिवार 24 मार्च 2024: रविवार 25 मार्च 2024: होळी 29 मार्च 2024: गुड फ्रायडे 31 मार्च 2024: रविवार

मार्च 2024 मध्ये एकूण 10 दिवस शाळांना सुट्या असतील. या सुट्ट्या यूपी, बिहार, हरियाणा आणि उत्तर भारतासह देशभरातील अनेक राज्यांसाठी आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी सबंधित शाळेकडून सुट्ट्यांची खात्री करुन घ्याव. सुट्ट्यांमध्ये बदलही होऊ शकतो.