यंदा आठव्यांदाही जयंत पाटीलच विजयी होतील जनतेचा विश्वास…..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज उरण-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. पंचायत समिती इस्लामपूर येथून अर्ज भरण्याच्या रॅलीची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी जयंत पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना येथील राम मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसिंह नाना पाटील आणि हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यंदा आठव्यांदा अर्ज दाखल करणार आहेत. जयंत पाटील यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढली असून इस्लामपूरच्या जनतेने आजतागायत त्यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. यंदा आठव्यांदाही जयंत पाटीलच विजयी होतील याचा विश्वास जनतेच्या मनात आहे.