LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता कधी? सर्वात मोठी बातमी समोर

राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून अंतरीम अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर आता समोर आलं आहे. एका मेळाव्यात बोलताना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांना देखील जोरदार टोला लगावला आहे.

कोणही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला. त्यांना जोडा दाखवा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार , आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता बहिणींना मिळेल.