जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला….

निवडणुकांमध्ये हार-जित होत असते. कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे हे त्या त्या मतदारसंघातील जनता ठरवते.

त्यामुळे आम्ही इतरांसारखी याला पाडतो, त्याला पाडतो, हा कसा निवडून येतो ते बघतो, अशी भाषा करत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 45 उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी अजित पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर टोला लगावला.