विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज देण्याची मुदत २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत आहे.घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून मतदान करता येणार आहे. त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल.
ठळक बाबी…
८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत भरून द्यावा लागणार अर्ज
मतदान केंद्रांवर येवू न शकणाऱ्या ज्येष्ठांचे मतदान १० नोव्हेंबरपासून सुरु होईल
८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या मतदानावेळी एक मायक्रो ऑब्झर्व्हर, दोन कर्मचारी, एक पोलिस असे पथक असणार
संबंधित विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे प्रतिनिधीही ज्येष्ठांच्या मतदानवेळी तेथे उपस्थित राहावू शकतात