सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल. अनेक गरजू लोकांपर्यंत हे धान्य पोहोचावे आणि गैरवापर रोखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ३१ जिसेंबर २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही केवायसी पूर् करुन घेऊ शकता.
रेशन कार्डची ई- केवायसी कसे करायचे?
१) सर्वप्रथम तुम्ही रेशनकार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा.
२) रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथला दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल.
३) मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
पण तुमच्या कुटुंबातील आणि रेशन कार्डवर नाव असलेल्यांपैकी कोणत्या व्यक्तीची केवायसी झाली किंवा झाली नाही हे तपासणे आधी गरजचे आहे. पण ते तपासायचे कसे जाणून घेऊ…
रेशनकार्डमधील सदस्यांची ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसं तपासायचं? जाणून घ्या
१) सर्वप्रथम मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जा आणि मेरा राशन नावाचे अॅप डाऊनलोड करा.
२) अॅप चालू होतात तुम्हाला स्क्रीनवर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.
३) यापैकी तुम्ही आधार किंवा रेशन कार्ड दोघांपैकी एकाचा क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करा.
४) यानंतर आधार सिडिंग ऑप्शनवर या.
५) आता तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर आधार सिंडिंग YES किंवा NO असं ऑप्शन दिसेल.
६) ज्या सदस्याच्या नावासमोर YES हा ऑप्शन असेल तर त्या सदस्यासा केवायसीची गरज नाही, पण NO असल्यास त्या सदस्याला केवायसी करणे गरजेचे आहे.
७) पण ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.