Diwali Holiday: दिवाळीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मजा! नोव्हेंबरमध्ये ‘इतके’ दिवस शाळांना सुट्ट्या

महत्वाचा प्रमुख सण दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा भारतातील सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशासह देशाबाहेरील भारतीयदेखील दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरा करतात. याला दिव्यांचा सण म्हटलं जातं. दिवाळीच्या या खास क्षणी शाळा-कालेज आणि इतर शिक्षण संस्था तसेच ऑफिसला सुट्टी असते. यूपी, बिहार, दिल्लीसहित काही राज्यांमध्ये 4 ते 5 दिवस सुट्टी आहे. भारतातील काही राज्यांमध्ये केवळ एकच दिवस सुट्टी आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जास्त दिवस सुट्टी आहे. याबद्दल जाणून घेऊया.  

31 ऑक्टोबर 2024 म्हणजेच गुरुवारपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी काही लोक 1 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी हा सण साजरा करतात. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असते. महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. शिक्षकांना सुट्ट्याच्या काळात निवडणूक प्रशिक्षणाचे काम असते.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शालेय आणि काँलेजच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत. यंदा महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना एकूण 14 दिवस सुट्ट्या असतील. राज्यातीन अनेक शाळा 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. काही प्राथमिक शाळा 16 नोव्हेंबरला सुरु होतील.