हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, रजनीताई मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात जनसुराज्य पक्षाशी असलेले नाते अशोकराव माने यांनी जपलेले आहे. त्यामुळे गुलालाची पोती घेऊनच निकाला दिवशी उपस्थित रहा आणि आपला माणूस म्हणून अशोकराव माने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.