इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात होणार पाच रंगी लढत……

भाजपाकडून राहुल प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मदन कारंडे तसेच मनसेकडून रवी गोंदकर तसेच जांभळे गटातून सुहास जांभळे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे विठ्ठल चोपडे हे देखील बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

आणखी कोणी अपक्ष म्हणून भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदार राजा कुणाला निवडून देणार हा येणार काळ ठरवेल. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी महायुतीकडून आपापले उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुतीकडून भाजपाचे राहुल प्रकाश आवाडे, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून मदन कारंडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते विठ्ठल चोपडे हे अपक्ष फॉर्म भरणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच मनसेकडून रवी गोंदकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तसेच ते कामालाही लागले होते. ते सुद्धा अपक्ष म्हणून लढणार का? आवाडे, हाळवणकर एकत्र आल्यामुळे भाजपची मोठी ताकद वाढली आहे .

महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला आहे. तसेच काँग्रेस पक्षाचा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ पारंपारिक असताना सुद्धा ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्याकडे गेल्यामुळे काँग्रेस व शिवसेनेमधून नाराजीचा सूर उमटला आहे. आता रिंगणात राहुल प्रकाश आवाडे, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, सुहास जांभळे, रवी गोंदकर यांनी आपली उमेदवारी घोषित केलेली आहे.त्यामुळे इचलकरंजी विधानसभेची निवडणूक पाचरंगी होणार आहे हे मात्र स्पष्ट झाले.