IND vs PAK: दिवाळीदिवशी भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार, सामना लाइव्ह कुठे पहायचा?

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे संपूर्ण जगाला वेड आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते जगभर पसरलेले आहेत. त्यामुळेच जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येतात तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या महान सामन्याकडे लागतात.दिवाळीच्या खास मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि आतुरतेने वाट पाहत आहेत.

हाँगकाँग सिक्स टूर्नामेंट या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हा सामना खेळवला जाईल.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच फॅनकोडवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे. भारतीय संघाची कमान 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला फलंदाज रॉबिन उथप्पाकडे सोपवण्यात आली आहे. उथप्पाशिवाय आणखी 6 खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.