या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठ्या संभ्रमात टाकले. काल-आज अशी खरेदीचा संभ्रम असणाऱ्या काही ग्राहकांना लॉटरी लागली तर काहींना फटका बसला. आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत घसरण झाली. तर नंतर मौल्यवान धातुनी गगन भरारी घेतली. लक्ष्मी पूजनापूर्वी दोन्ही धातुनी मोठी उसळी घेतली. ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागला. आता दिवाळी पाडव्यासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. दोन्ही धातुत मोठी घसरण झाली. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती
काहींची दिवाळी, तर काहींना फटका
या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले. 29 आणि 30 ऑक्टोबरला मौल्यवान धातुत अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरला सोने 170 रूपयांनी वधारले. 1 नोव्हेंबर रोजी सोने 770 रुपयांनी घसरले. तर आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे सत्र दिसले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,071 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा
या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 2 हजारांनी वधारली होती. या 29 आणि 30 ऑक्टोबरला प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरच्या किंमती अपडेट झाल्या नाहीत. तर 1 नोव्हेंबर रोजी किंमतीत 3 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,557, 23 कॅरेट 79,238 22 कॅरेट सोने 72,874 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,668 रुपये, 14 कॅरेट सोने 46,541 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,670 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.