अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज अडकणार लग्नबंधनात

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र अंबानीच्या लग्नाची धूम पहायला मिळ आहे. अंबानी कुटुंब आपल्या दुसऱ्या सूनेचं स्वाग करण्यासाठी एकदम सज्ज झालेत.मुलाचं लग्न खास व्हावं यासाठी अंबानी कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून या भव्य सोहळ्यासाठी तयारी करत आहेत.

अनंत राधिकाचा प्री-वेडिंग सोहळाही खूप शाही झाला. आता सर्वांचं लक्ष त्याच्या लग्नाच्या खास क्षणाकडे आहे. आज हा शाही कार्यक्रम कसा असणार आहे हे पाहुया.अनंत राधिकाच्या लग्नासाठी देश विदेशातील पाहुणे हजर राहणार आहे. जेवणापासून, पोशाख आणि सर्वकाही एकदम खास असणार आहे.

या शाही सोहळा आज नेमका कसा पार पडणार आहे? यावर एक नजर टाकुया.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाह सोहळा आज 12 जुलै रोजी संपन्न होणार असून या विवाह पारंपारिक वैदिक हिंदू पद्धतीनं होणार आहे. अनंत आणि राधिका दोघेही गुजराती असून त्यांच्या लग्नात गुजराती विधी होतील.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाचं वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे.मिरवणूक आणि पगडी बांधण्याचा कार्यक्रम दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होणार आहे. यानंतर सभा होईल. रात्री 8 वाजता वरमाला सोहळा पार पडेल.

लग्न, सप्तपती, सिंदूर भरणं रात्री 9.30 च्या सुमारास सुरु होईल.दरम्यान, लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

13 आणि 14 जुलैला वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलंय. लग्न आणि रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील पाहुणे मंडळी असणार आहे. राजकीय, औद्यागिक, क्रीडा, कलासृष्टी, सर्वच क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहे.