दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजनाळे येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शेकाप नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील शेकाप मधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
अजनाळे येथील राकेश बनसोडे, सोमनाथ धांडोरे, अतुल धांडोरे, बापू धांडोरे, डॉ.धांडोरे, रोहित बनसोडे, प्रितम धांडोरे, युवराज ढोबळे, संदीप धांडोरे, धना गाडे, बंडू धांडोरे, अमर धांडोरे, साहिल चंदनशिवे, उमेश धांडोरे, अनिल वाघमारे, विनायक धांडोरे, विशाल गेजगे, अजय धांडोरे, नंदू बनसोडे, विजय भडंगे यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना अजनाळे गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी विजयदादा येलपले आणि मान्यवर उपस्थित होते.