सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अधयाक्षपदी पुण्य नगरीचे सांगोला प्रतिनिधी मनोज उकळे यांची तर सचिवपदी आनंद दौंडे , कार्याध्यक्षपदी नावेद पठाण व उपाध्यक्ष्यपदी अमेय मस्के यांची अविरोध निवड झाली .
सोमवार (ता १९) रोजी तालुका पत्रकार संघाची बैठक सांगोला येथील पत्रकार भवनामध्ये पार पडली . या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर पदाधिकार्यांच्या निवडी संपन्न झाल्या . या बैठकीसाठी अशोक बनसोडे , संजय बाबर , दिलीप घुले , दत्तात्रय खंडागळे , मिनाज खतीब , डॉ . वैभव जांगळे , किशोर म्हमाणे , मोहसीन मुलाणी इत्यादी सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अरविंद केदार यांच्या हस्ते करण्यात आला . सूत्रसंचालन दत्तात्रय खंडागळे यांनी तर आभार डॉ. वैभव जांगळे यांनी मानले.