जनतेच्या सुख, दुःखाचा साथीदार म्हणून जनता प्रचंड बहुमतांनी विजयी करेल – दिपकआबा साळुंखे पाटील

महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ बामणी, मांजरी, देवकतेवाडी, देवळे, सावे, मेथवडे येथे गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. सर्वसमाजासाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे. स्व. गणपतराव देशमुख यांना २५ वर्षे आणि शहाजीबापू पाटील यांना ५ वर्षे मदत केली आहे हे जनतेला माहीत आहे. आतापर्यंत जनतेचा सेवक म्हणून जनतेची अनेक कामे केलेली आहे.

समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू ठरवून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. जनतेच्या सुख, दुःखाचा साथीदार म्हणून जे केलेलं काम आहे त्यामुळे जनता मला नक्की आशीर्वाद देईल आणि प्रचंड बहुमतांनी मला विजयी करेल हा मला विश्वास आहे, असे मत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, गेल्या ३०-३५ वर्षापासून तालुक्याच्या विकासात योगदान दिल्याने मतदारसंघातील जनता आमच्यासोबत शंभर टक्के आहे, तसेच त्यांचा आशिर्वाद ही आमच्या सोबत आहे. गेली
राजकारणात कर्तृत्वाने वारसदार ठरवला जातो. गणपतराव देशमुख यांच्या आमदारकीच्या रेकॉर्डमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. ३० वर्षे मी स्व.गणपतराव देशमुख यांची सेवा केली. तीन वर्षांपूर्वी तुम्ही वारसदार म्हणून तालुक्यात आला आहात, तुम्ही आधी जनतेची कामं करा असा सल्ला शेकापच्या डॉ.देशमुख बंधूंना दिला. त्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांनी मला साथ देवून विजयी करावे हीच गणपतराव देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

गेल्या ३० वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता विधानसभा निवडणुकीत आशिर्वाद देणार असल्याचा विश्वास आहे. गेल्या पाच वर्षात प्रशासकीय कामातील शिस्त बिघडली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी कधीही भीक मागू देणार नाही. तालुक्याला हक्काचे पाणी मिळणारच असून पाण्याची शिस्त लावणार आहे. तालुक्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी एकदा संधी द्या असे आवाहन करून ३०-३५ वर्षाच्या राजकारणात जिकडे दिपकआबा तिकडे गुलाल हे समीकरण असून विधानसभा निवडणुकीत दिपकआबांचा दिवस उगवणारच असा विश्वास दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.


यावेळी पी.सी.झपके, सदाशिवतात्या साळुंखे, रावसाहेब इंगोले, नानासो पाटील, शंकर बिचुकले शिवाजीराव चव्हाण, भगवान इंगोले, अजित देवकते, सुनील भोरे, अभिषेक कांबळे, नंदकुमार दिघे, तुषार इंगळे, दीपक शिनगारे, सचिन शिनगारे, अमृत उबाळे, प्रकाश शेळके, विनायक कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, नवनाथ शिनगारे, तानाजीकाका पाटील, शाहूराजे मेटकरी, अनिलनाना खटकाळे, अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, नंदकुमार दिघे, अनिल दिघे, सूर्याजी खटकाळे, सागर मिसाळ, लक्ष्मण शेंडगे, उत्तम माने, सत्तार शेख, सुभाष खंडागळे, विलास माळी, संभाजी ताटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.