IND vs SA : टीम इंडिया-साऊथ आफ्रिका टी 20I मालिका, कोण करणार विजयी सुरुवात?

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही शुक्रवार 8 नोव्हेंबरपासून होत आहेत. टीम इंडिया  या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 4 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर यजमान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही एडन मार्करम याच्याकडे आहे. पहिला सामना हा 8 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर त्याआधी 8 वाजता टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

तर मोबाईलवर लाईव्ह मॅचचा थरार जिओ सिनेमा एपद्वारे अनुभवता येईल.टीम इंडियाने या आधी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तेव्हाही सूर्यकुमार यादवच भारताचा कर्णधार होता. तेव्हा भारताला 3 सामन्यांची मालिका जिंकता आली नव्हती. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. तर एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कॅप्टन म्हणून सूर्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे सूर्यकुमावर भारताला दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

सूर्या कॅप्टन्सीसह युवा खेळाडूंकडून त्याला हवं ते कसं काढून घेतो? या साऱ्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 27 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 11 वेळा विजयी होता आलं आहे.

तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आकडे पाहता टीम इंडियाच सरस आहे, हे स्पष्ट होतं. मात्र या मालिकेचं आयोजन हे त्यांच्या घरात करण्यात आलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला घरच्या स्थितीचा फायदा असणार आहे. अशात भारतीय संघासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ कशी कामगिरी करतं? हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.