‘झिम्मा २’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, बॉलिवूडच्या चित्रपटांना देतोय टक्कर

मराठी सिनेरसिकांनासाठी यंदाचा वर्ष खूपच खास ठरलं. या वर्षात एकापेक्षा एक जबरदस्त मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या वर्षाअखेरीला देखील काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची (Jhimma 2 Movie) बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरबाहेर मोठी गर्दी करत आहेत. अनेक शो हाऊसफूल होत आहेत.

बॉलिवूडचे ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ हे चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉलिवूडचे हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम दिसत आहे. ‘झिम्मा २’चित्रपट या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले की, ‘खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर ‘झिम्मा २’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते.’