ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्स कर्ज मुक्त होण्याच्या तयारीत आहे. पीसी ज्वेलर्सने आतापर्यंत जवळपास 70 टक्के कर्ज फेडले आहे. ही वार्ता बाजारात कळताच ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी उसळी आली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे या शेअरकडे लक्ष लागले आहे.
पीसी ज्वेलरचा शेअर बुधवारी BSE वर 6 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर बुधवारी 10.28 रुपयांवर पोहचला. कंपनीचे शेअर मंगळवारी 10 रुपयांवर बंद झाला होता. यावर्षात या शेअरमध्ये आतापर्यंत जवळपास 13 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या 5 वर्षात ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांहून अधिकची उसळी आली
पीसी ज्वेलर लिमिटेड कंपनी ही कर्जमुक्तीकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. कंपनीने आतापर्यत 68 टक्के कर्ज फेडले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारल्याचे दिसून येते. कंपनी आता अजून वेगाने झेप घेत आहे. कंपनीचे भविष्यातील योजना पण तयार आहे.पीसी ज्वेलर लिमिटेडच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीत वार्षिक आधारावर 28 टक्के वाढ झाली. हा नफा 190.10 कोटी रुपयांवर पोहचला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीला 147.96 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 च्या तिमाहीत पीसी ज्वेलरची एकूण उत्पन्न वाढून ते 900.51 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
