बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी अनेक वर्ष जोडीदाराला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर सारा अली खान कोणासोबत लग्न करणार? असा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. शिवाय अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती देखील समोर आली आहे. अशाच चाहते देखील अभिनेत्रीच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.
रेडिटच्या एका पोस्टनुसार, सारा लवकरच लग्न करणार आहे. सारा एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा युजरने पोस्टमध्ये केला आहे. पोस्टनुसार, सारा आणि उद्योजकाच्या कुटुंबियांकडून दोघांच्या नात्याला होकार आहे. लग्नामुळे सारा प्रचंड आनंदी आहे… अशी देखील माहिती समोर येत आहे. उद्योजक देखील सारावर प्रचंड प्रेम करतो…
‘मेट्रो इन दिनो’ सिनेमानंतर सारा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सिनेमाची शुटिंग संपल्यानंतर सारा हिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. पण यावर अद्याप सारा आणि तिच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण सर्वत्र सारा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.