विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.शिंदे गटाच्या शिवसेनेसह शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील वाघमोडेवाडी, आलेगाव येथील शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांसह शेकापच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली.
शिवसेनेचे शाखाप्रमुख नामदेव दत्तू सलगर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुरेखा नामदेव सलगर, जेष्ठ नेते आगतराव रामचंद्र वाघमोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार पडले आहे. वाघमोडेवाडी आलेगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख नामदेव दत्तू सलगर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुरेखा नामदेव सलगर, जेष्ठ नेते आगतराव रामचंद्र वाघमोडे, दीक्षा नामदेव सलगर, मारुती दत्तू सलगर, पूनम आण्णासो सलगर, निर्मलाबाई मच्छिंद्र सलगर, नितीन मच्छिंद्र सलगर, अशोक बबन सलगर, सुप्रिया अशोक सलगर, संभाजी रामहरी सलगर, मनीषा संभाजी सलगर, संतोष रामहरी सलगर, मोहिना संतोष सलगर, बिरा दत्तू शिंदे, सुरेश दत्तू शिंदे, प्रवीण दामोदर वाघमोडे, राणी प्रवीण वाघमोडे, जिजा आगतराव वाघमोडे, दत्तात्रय मारुती हजारे, संगीता दत्तात्रय हजारे, दिगंबर मारुती हजारे, काकासो संभाजी वाघमोडे, दगडू कृष्णा कोळेकर, संजय विठ्ठल वाघमोडे,
मनीषा संजय वाघमोडे, शरद सुभाष वाघमोडे, संतोष सुभाष वाघमोडे, विक्रम काटे, विजयकुमार शिवाजी शिंदे, भाऊसो शिवाजी शिंदे, दत्ता नामदेव अनुसे, बापू दादासो अनुसे, संतोष शिवाजी अनुसे, पुनम दत्ता अनुसे, कुंडलिक धायगुडे, समाधान नारायण अनुसे, धनाजी खताळ, तानाजी खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली.