काेण हाेणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? जनमानसात माेठी उत्सुकता

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे.आजपासून पाच दिवसांनी प्रचार संपेल आणि 20 नाेव्हेंबरला विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान हाेणार आहे. राज्यातील जनतेचा काैल काेणाला मिळाला, याचे उत्तर 23 नाेव्हेंबरला मतमाेजणीनंतर मिळणार आहे. देशात उत्तरप्रदेशनंतर लाेकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक म्हणजे 48 जागा महाराष्ट्रात आहेत.महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वातील महायुती तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी यांच्यात या निवडणुकीत खरी लढत हाेत आहे.

व्यूहरचनेचा भाग म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीने आपापला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे दाेन्ही आघाड्यांर्ते सांगितले जात आहे.महायुतीत भाजपा 151, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागा लढवत आहे. पाच जागा मित्रपक्षांसाठी साेडण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस 103, शिवसेना उबाठा 89 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 87 जागा लढवत आहेत. आघाडीने सहा जागा आपल्या छाेट्या मित्रपक्षांसाठी साेडल्या आहेत.महायुतीत एक माजी आणि एक आजी असे दाेन मुख्यमंत्री आहेत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र \डणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री हाेण्याची आपली इच्छा कधीच लपून ठेवली नाही. मात्र, यावेळीही ती पूर्ण हाेईल, असे वाटत नाही. कारण, महायुतीत तिसèया क्रमांकाच्या जागा त्यांच्या पक्षाला मिळू शकतात.त्यामुळे त्यांच्या नावाचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार हाेण्याची शक्यता नाहीच्या बराेबरच आहे. महायुतीत मुख्यमंत्र्याची निवड करताना ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक राहतील, त्या पक्षाला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत जागा जिंकण्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर, शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिसèया स्थानावर राहील, असा अंदाज आहे.

काेल्हापूर जिल्ह्यातील शिराळा येथे आयाेजित सभेत महायुतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र \डणवीस मुख्यमंत्री हाेतील, असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्यामुळे भाजपा गाेटात उत्साहाचे वातावरण निर्माण हाेणे स्वाभाविक आहे.महाविकास आघाडीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. यातील पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदाचे दिवसरात्र स्वप्न पाहणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. विधानपरिषदेचे अनेक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची हिंमत झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अर्धा डझन इच्छुक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

यात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटाेले, विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात, नितीन राऊत यांच्यासह आणखी अनेकांचा समावेश आहे. वेळ पडली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही यात मागे राहणार नाहीत. काेराेना काळात मुख्यमंत्री झालेल्या आणि मंत्रालयात कधीच न गेलेल्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावे, असा अयशस्वी प्रयत्न त्यांनी आपले ‘हिज मास्टर्स व्हाॅईस’ संजय राऊत यांच्यामार्फत करून पाहिला.

मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे यांची द्विधा मनस्थिती आहे. आपण मुख्यमंत्री व्हावे की आपल्या मुलाला आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करावे, याबाबत त्यांचा गाेंधळ उडत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील वगळता मुख्यमंत्री हाेण्यासाठी नेतेच उरले नाहीत. महायुतीत जी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आहे, तीच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे.उद्धव ठाकरे यांना ज्याप्रमाणे आपल्या मुलाला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्याचप्रमाणे शरद पवार यांना आपल्या मुलीला सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील सर्वात माेठा अडथळा सुप्रिया सुळे यांचाच हाेता. शरद पवार आपल्याला कधीही मुख्यमंत्री करणार नाही, याची खात्री असल्यामुळे अजित पवार शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले हाेते.

एकंदरीत महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळेल की महाविकास आघाडीला, नवीन मुख्यमंत्री महायुतीचा हाेणार की महाविकास आघाडीचा, महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री महायुतीतील काेणत्या पक्षाचा हाेणार, भाजपाचा की शिवसेनेचा तसेच महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर काँग्रेसचा हाेणार की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा याबाबत जनमानसात माेठी उत्सुकता निर्माण हाेणे स्वाभाविक आहे.