Maharashtra Election 2024 : आता मतदारांना घरपोच मिळणार मतदार स्लीप; बीएलओकडून वाटप सुरू

सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील मतदार देखील आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करायला जाताना मतदाराकडे यादीतील क्रमांक असलेले स्लीप असणे आवश्यक आहे.त्याचे वाटप प्रत्येक पक्षाकडून केले जाते. त्यावर उमेदवाराचे चिन्ह व फोटो असतात. त्यामुळे ते मतदान केंद्रावर घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बीएलओंकडून आता मतदार स्लीप घरोघरी जाऊन वाटपाचे काम सुरू आहे.मतदानाला जाताना ही मतदार स्लीप सोबत असणे अनिवार्य आहे.

यामध्ये नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदारांचा शोध, अशा अनेक कामांकरता प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक ‘बीएलओ’ नेमण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून आता मतदानापूर्वी प्रत्येक मतदारांना मतदान स्लीप देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे वाटप सध्या सुरू असून त्यावर मतदान केंद्राचे नाव आणि क्रमांक तसेच मतदार यादीतील क्रमांक नमूद केलेला असतो. मतदानाला जाताना ही स्लीप सोबत ठेवावी लागते. तसेच या दरम्यान voter helpline app आणि voters.eci.gov.in या संकेतस्थळावरही मतदारांना आपले मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांक पाहता येणार आहे.