विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेसह शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील वाघमोडेवाडी, आलेगाव येथील शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांसह शेकापच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली.
शिवसेनेचे शाखाप्रमुख नामदेव दत्तू सलगर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुरेखा नामदेव सलगर, जेष्ठ नेते आगतराव रामचंद्र वाघमोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार पडले आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशी दिपकआबांची वेगळी ओळख आहे.
समाजातील उपेक्षित, गोरगरीब, वंचित घटकांचा तारणहार म्हणून दिपकआबांकडे पाहिले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिपकआबा साळुंखे पाटील हेच न्याय देऊ शकतील असा विश्वास असल्याने शेकडो कार्यकर्त्यांसह दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत दिपकआबांना आमदार करून दाखविणारच असा विश्वास शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुरेखा नामदेव सलगर यांनी व्यक्त केला.