राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा सुरू आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेले जनतेच्या मनातील मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत आहेत.
रविवार म्हणजे 4 ऑगस्ट या दिवशी दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जनसंवाद व गावभेट दौरा कार्यक्रम सुरू होणार आहे. म्हणजेच रविवारी आणि सोमवारी या दोन दिवशी त्यांचा हा गाव भेट दौरा सांगोला तालुक्यामध्ये होणार आहे. अनेक वाड्यावस्त्यांवर जाऊन ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडीचनी, समस्या जाणून घेऊन त्या अडीअडचणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न देखील करणार आहे.
मागच्या गावभेट दौऱ्यामध्ये दिपकआबा साळुंखे पाटील यांनी अनेक जनतेच्या अडीअडचणी अगदी एका फोन कॉलवर सोडवल्या होत्या. आता अशाच समस्या नागरिकांच्या सोडवण्यासाठी ते आता राजापूर, वाढेगाव, मेडशिंगी, बूरलेवाडी, आलेगाव, गळवेवाडी, डोंगरगाव या भागात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दिपकआबांच्या पुढे व्यक्त करायला हव्यात जेणेकरून दिपकआबा पाटील त्यांच्या या समस्या नक्कीच सोडवतील.