IPL 2025 Mega Auction : ऐनवेळी मुंबईला दगा दिला, आता मिळाली सजा! ‘हा’ दिग्गज खेळाडू मेगा ऑक्शनच्या थेट बाहेर!

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, बीसीसीआयने 574 शॉर्टलिस्ट खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यात 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्याच वेळी, काही मोठ्या खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आलेली नाहीत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यात गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सला फसवणाऱ्या स्टार खेळाडूचाही समावेश आहे.

जगभरातील अनेक परदेशी खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट फ्रँचायझी लीगमध्ये सहभागी होतात. आयपीएल 2025 मेगा लिलावात 208 परदेशी खेळाडूंची बोली लावली जाणार आहे, ज्यामध्ये 3 सहयोगी राष्ट्रांतील खेळाडूंचाही समावेश आहे. पण, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव या यादीत नाही.नुकताच स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची वेस्ट इंडिज-इंग्लंड मालिकेत खेळला होता. पण, गेल्या काही वर्षांपासून आर्चरला सारखी दुखापत होते असते.

कुठेतरी त्याच्या दुखापतीमुळे फ्रँचायझींनी त्याच्यावर कोणती बाजी लावली नसावी. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुंबईच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण तेव्हा कळले की आर्चर आयपीएल 2022 साठी उपलब्ध नाही.

पण, त्यानंतर आर्चर आयपीएल 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आला, परंतु कोपराच्या दुखापतीमुळे तो केवळ 4 सामने खेळून इंग्लंडला परतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आर्चर व्यतिरिक्त अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा, सौरभ नेत्रावलकर, कॅमेरून ग्रीन अशी मोठी नावे वगळण्यात आली आहेत.