मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न बेरोजगारी व महिलांसाठी नवीन योजना याबाबत मी स्वतः लक्ष घालून हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शद्ब सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राहुल शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष मुजफर काझी, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, जेष्ठ नेते दादासाहेब गरंडे, राजाभाऊ चेळेकर, महिला नेत्या संगीता कट्टे, यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, अनिल सावंत हे आधाराची सावली म्हणून तुमच्या सोबत कायम उभे राहणार आहेत. मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मला पवार साहेबांनी अनिल सावंत यांच्यासाठी पाठवले आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या एकच नारा घुमतोय राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. वातावरण बदलत चाललेय आहे. मंगळवेढा व सोलापूरकरांनी पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले आहे. सगळ्यात युवा मुख्यमंत्री म्हणून शरद पवार हे झाले होते. ते सोलापूरला आले तेव्हा लोकांनी रस्त्यावरून गुलाबाच्या पाकळ्या टाकून मिरवणूक काढली होती.मी विठ्ठलाची भक्त आहे. ही संतांची भूमी आहे. अनिल सावंत यांचा पारदर्शक कारभार आहे. त्यामुळे अशा उमदा उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे.