ऐन थंडीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, थंडीचा मुक्काम थोडाच……

राज्यात थंडीचा जोर वाढला असतानाच हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात चक्रीवादळासदृश्य स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा बाष्पयुक्त वारे येत आहेत.यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम फक्त काही दिवसांसाठीच राहणार आहे. हवामान विभागाच्या मते, 23 नोव्हेंबरपासून राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि 26 नोव्हेंबरपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता आहे.