कोल्हापूरमध्ये प्राथमिक शाळेत पालकांचा गोंधळ, प्रार्थनेवर घेतला आक्षेप….

कोल्हापूरच्या जाधववाडी येथे प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर शाळेत ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी रोज ‘ए मत कहो खुदासे’ ही प्रार्थना म्हणत असतात. दरम्यान या प्रार्थनेमध्ये उर्दू शब्द असल्याने पालकांनी त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर घडला आहे.

त्यामुळे शाळेसमोर नागरिकांची गर्दी जमली होती. शाळेत पालक गोंधळ करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील शाळेत पोहोचले होते. त्यांनी पालकांना समजविण्याचा प्रयत्न केला.

मात्र पालक हे आपल्या तक्रारींवर ठाम होते. दरम्यान या प्रकाराबद्दल दोषी शिक्षकांना निलंबित करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तक्रार घेऊन येणाऱ्या पालकांनी शिक्षक मुलांना विविध प्रकारची शिक्षा देत असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षकांना जाब विचारला.

त्यामुळे या परिसरातील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होतं. दरम्यान पालकांची तक्रार आल्याने सदरची प्रार्थना शाळेत घेतली जाणार नसल्याचं लेखी पत्र शाळा प्रशासनाने पालकांना दिले आहे. तसचं इतर तक्रारीवरही कार्यवाही करण्याचं आश्वासन शाळा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.