ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी मिळतील 2100 रुपये

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय. सरकारने मागील पाच महिन्यांच्या हफ्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केलीय.महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांमध्ये केली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याने महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

अशातच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, “ज्या महिला पात्र आहेत. त्यांना आता नेहमीप्रमाणे पैसे मिळतील. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 करण्यासंदर्भात सरकारचा मनोदय आहे. तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकत्रित अंदाज आहे”.