Ladki Bahin Yojana: अन्नपूर्णा योजनेबाबत मोठी अपडेट! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार मोफत गॅस सिलिंडर

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. आता महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता महिलांना कधीपासून २१०० रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरदेखील मिळणार आहे.

लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, जानेवरी २०२५ मध्ये महिलांना पहिला गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. गॅस सिलिंडरचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. या योजनेच्या अंबलबजावणीमुळे महिलांना महिन्याचा आर्थिक खर्च भागवण्यास मदत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना लवकरच गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच गॅस सिलिंडर मिळणार आहे.या योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर वितरण करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे याबाबत माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल.