वाढत्या महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. येत्या 1 एप्रिल 2024 पासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचा समावेश आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने होलसेल प्राइस इंडेक्समध्ये (WPI) अनेक बदल केले आहेत. तसेच, सरकार राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये (NLEM) 0.0055 टक्क्यांची वाढ करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून औषध कंपन्यांकडून वाढत्या महागाईमुळे दर वाढवण्याची मागणी होत आहे.यापूर्वी 2022 मध्ये औषधांच्या किमतीत 12 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. रिपोर्टनुसार, वर्षातून एकदा औषधांच्या किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांत औषधात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत 15 ते 130 टक्के वाढ झाली आहे. पॅरासिटामॉल 130 टक्क्यांनी वाढली आहे, तर एक्सीसिएंट्सच्या किमती 18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इतर अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत.
ज्या औषधांचा बहुतांश लोक नियमित वापर करतात, त्यांचा या यादीत समावेश होतो. या औषधांच्या किमती सरकारच्या नियंत्रणात असतात. कंपन्या या औषधांच्या किमती वर्षभरात केवळ 10 टक्के वाढवू शकतात. या यादीत कर्करोगविरोधी औषधांचाही समावेश आहे.
अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये पॅरासिटामॉल सारखी औषधे, ॲझिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड्सदेखील यादीत आहेत.