Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमानच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार सिकंदरचा टीझर

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या बिष्णोई प्रकरणामुळे चर्चेत आहे. अनेक जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘सिकंदर’चे चित्रीकरण करत आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदाना देखील आहे.सध्या हा चित्रपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता खूप वाढली आहे. सलमानचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आणि आता, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी खुलासा केला की सिकंदर या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा टीझर सलमान खानच्या ५९ व्या वाढदिवशी प्रदर्शित होईल, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस आणखी खास होईल. पण एवढेच नाही, सलमान खानच्या चाहत्यांसाठी हा आनंद दुप्पट आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर देखील त्याच दिवशी सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान लाँच केला जाईल.

२०१४ मध्ये ‘किक’ नंतर पहिल्यांदाच सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला एकत्रित हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.माहितीनुसार, सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. “सिकंदर हा २०२५ मधील बहूप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि निर्माते सिकंदरच्या टीझरसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयारी करत आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये ईदच्या दिवशी मार्च महिन्यात प्रदर्शित होईल. साजिद नाडियाडवालांनी चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांसमोर सिकंदर सादर करण्यासाठी मोठ्या योजना आखल्या आहेत.