बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. मात्र त्याबद्दल काही कलाकार अगदी उघडपणाने बोलतात तर काही जण स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळतात. पण एका अभिनेत्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. तो अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यनने स्वत:ची अशी वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर तयार केली आहे. कार्तिकने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकताच रिलीज झालेल्या कार्तिकच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाने कोटींची कमाई केली. कार्तिक जसा त्याच्या चित्रपटामुळे जसा चर्चेत असतो तसाच तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही तेवढाच चर्चेत असतो. त्याने नुकतच एका मुलाखतीमध्ये त्याच्या लव्ह लाईफबद्दलचे काही किस्से शेअर केले आहे.
पुढे बॉलीवूडमध्ये आल्यावरही कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांचे नाव जोडले गेले. कार्तिकने सांगितले की त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे कॉलेजमध्ये असतात त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. कार्तिकने सांगितले की “माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की मी अभिनय केला तर ती माझ्यासोबत राहणार नाही. ती म्हणाली होती की ती एका अभिनेत्याचे आयुष्य सांभाळू शकत नाही.” अस स्पष्ट मत मांडत त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत असलेले नात तोडलं होतं.
बॉलिवूडमध्ये आल्यानंतरहील कार्तिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातील पहिलं नाव म्हणजे सारा अली खान. 2019 मध्ये अभिनेत्री सारा अली खानसोबत कार्तिकचं नाव जोडलं गेलं. इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.
