डिसेंबरचा अर्धा महिना संपला तरी अजूनही लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू होती, मकरसंक्रांतीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होईल असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तूर्तास तरी निकषांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. 2100 रुपये मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना बजेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिवाय एकाच घरातील दोन महिलांना देखील लाभ मिळण्याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. ज्यांना पाचवा हप्ता आचारसंहितेमुळे मिळाला नाही त्यांना पाचवा आणि सहावा हप्ता आता मिळणार आहे.ज्यांनी चार खाती उघडली आहेत, किंवा जे फसवणूक करून पैसे घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असेल, तर लाभ मिळणार नाही. चारचाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी करणारा कुटुंबातील व्यक्ती असेल तर लाभ मिळणार नाही.लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता. तुम्ही या साईटवर मोबाईलनंबरने अकाउंट सुरू करा. त्यानंतर स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला पैसे आले की नाही याबाबत माहिती मिळेल.तुमचा अर्ज बाद झाला असेल तर खात्यावर पैसे येणार नाहीत.