इचलकरंजीत शुक्रवारपासून राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे सव्विसावे वर्ष आहे. शुक्रवारी २७ तारखेला दुपारी एक वाजता उद्‍घाटन होणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, बेळगाव विभागातील ३६ संघांचा सहभाग आहे. परीक्षक ज्ञानेश मोघे (गोवा), मंगेश दिवाणजी (पुणे), यशोधन गडकरी (सांगली) आहेत.