सोमवारी म्हणजेच दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी या दिवसाचे पवित्र राखण्यासाठी देशभर अनेक निर्णय घेण्यात येत आहेत.
तर इचलकरंजीत सोमवारी चिकन, मटण यासह सर्व प्रकारची मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन बरोबर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. इचलकरंजी परिसरात देखील या दिवसाचे पवित्र राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.