राज्यातील 21 जिल्ह्यांत 26 ते 28 डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 व 27 डिसेंबरला नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह 11 जिल्ह्यांत गारपिटीचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू शकते.
कुठे पावसाचा अंदाज?
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, पुणे, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्य कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.