SSC – HSC Exam 2024: 10वी – 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारा निर्णय बोर्डाने घेतला आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत आणि तरुळक विषय, ITI चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. ही आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पद्धतीने 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरावयाची होती. या तारखांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा – 31 ऑक्टोबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS / NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करायची तारीख – 27 नोव्हेंबर 2024