महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून ३ घरगुती सिलिंडर मोफत मिळणार आहे.ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलिंडरची कनेक्शन आहे. त्यांनाच या योजनेअंतर्गत मोफत सिलिंडर मिळतात. त्यामुळे आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांना ते करुन घेण्याची सुवर्णसंधी आहे.
अनेक पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्या ते स्वतः च्या नावावर करु शकतात. याच पार्श्वभूमीवर आता तुम्ही तुमच्या घराजवळील गॅस एजन्सीमधून तुमच्या नावावर गॅस कनेक्शन घेऊ शकतात.तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन गॅस कनेक्शनवरील नाव बदलू शकतात.
तुम्हाला फक्त एका साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव बदलेल. यानंतर महिलांना योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. सुरुवातीला लाभार्थी महिलांना संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहे त्यानंतर शासनाचे अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाईल.