वातावरणात सतत बदल होत आहे. अचानक थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तपमानात अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचं प्रमाण देखील वाढलं आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार या आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये, महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.हवामान विभागानुसार या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस जम्मू काश्मीर आणि परिसरातच होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर राज्यात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. थंडी वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
