सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. तर अनेक अभिनेत्री आई देखील झाल्या आहेत. तसेच बॉलिवूडमध्ये अफेअर्स, लिव्ह इन, ब्रेकअप यासर्व गोष्टींची चर्चा कायमच होत राहते. तसेच अनेक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही बातम्या आहेत. पण अशी एक अभिनेत्री अशी आहे जिला कधीही लग्न करायचं नाहीये. बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीने एक तिच्या लग्नाबद्दलचे विचार आणि तिची इच्छा व्यक्त केल्यावर सर्वजण शॉक झाले आहे.
कारण या अभिनेत्रीने ती कधीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. श्रुती हासन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तशी नेहमीच चर्चेत असते. पण ती सध्या तिच्या लग्नाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रुतीला प्रेम, रोमांस किंवा अगदी लिव्ह इन मध्ये राहायलाही आवडतं. पण तिला लग्न आवडत नाही. ती बरीच वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होती. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्येही राहायची.
पण तिने लग्न करण्यास साफ नकार दिला आहे.एका मुलाखतीत श्रुतीला ती अजूनही लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे का? याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली,” मला नाती आवडतात. प्रेम, रोमांस, लिव्ह इनमध्ये राहायलाही आवडतं. पण मला लग्न आणि अटॅचमेंटची भिती वाटते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, श्रुती लग्नाबाबत कोणत्याही भूतकाळातील अनुभवांना प्राधान्य देत नाही. तिचे असे अनेक मित्र आहेत जे यशस्वी विवाहित आहेत.तसेच अभिनेत्री कोणावर कधीच प्रेम करणार नाही असं नाही. ती आवडणाऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासही तयार आहे. पण लग्नासाठी वचनबद्ध होणार नाही असं तिने स्पष्टच सांगितले आहे.