अभिनेता सलमान खानचे केवळ देशभरातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये ‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला. त्याने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. मात्र 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सलमानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय.
यासोबतच त्याने प्रचंड पैसाही कमावला आहे. सलमान हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सलमान त्याच्या एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन स्विकारतो. चित्रपटांशिवाय जाहिराती आणि कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करूनही तो बराच पैसा कमावतो. याशिवाय छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चंही तो सूत्रसंचालन करतो. यातूनही त्याची रग्गड कमाई होते.
सलमान खानचा प्रत्येक वाढदिवस हा त्याच्यासाठी स्पेशल असतो. सलमानच्या वाढदिवशी त्याची एखादी नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सलमान खानयंदा त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे.यानिमित्ताने त्याच्या सिकंदर सिनेमाचा टीझर रिलीज होणार होता. मात्र सिंकदरचा टीझर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 27 डिसेंबर रोजी त्याच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर रिलीज होणार होता.
मात्र त्याचं रिलीज पोस्टपोन करण्यात आलं आहे. 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निर्मात्यांनी ‘सिकंदर’च्या टीझरची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित सिकंदरचा टीझर आज रिलीज होणार नाहीये. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
साजिद नाडियादवाला यांनी सिकंदरचा टीझर रिलीज करण्याची नवी तारीख जाहीर केली आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा टीझर आता 28 डिसेंबर रोजी सकाळी 11:07 वाजता ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या अधिकृत X अकाऊंटवरून याची माहिती देण्यात आली आहे.
X पोस्टमध्ये लिहिलंय, आपले आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर, ‘सिकंदर’ चित्रपटाचे टिझरचे रिलीज पुढे ढकलण्यात आल्याबद्दल आम्हाला दु:ख होत आहे. तो आता 28 डिसेंबर रोजी सकाळी 11:07 वाजता प्रदर्शित होणार आहे. याआधी साजिद नाडियाडवाला यांनी ‘सिकंदर’ पोस्टर रिलीज केलं होतं. ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्सने भरलेला हा सिनेमा सलमान खानचा पुढील ब्लॉकबस्टरची सिनेमा असू शकतो असा दावा करण्यात आला आहे. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.